हिंगोली : कोरोना रुग्णांची संख्या खुप माेठ्या प्रमाणात हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती युद्ध पातळीवर करण्याच्या सुचना हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी दिल्या आहेत.
या बाबत राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी पालकमंत्री यांना या बाबत पत्र पाठवून हिंगोली शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच उपचारादरम्यान ऑक्सिजनची कमतरता सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना जाणवत आहे. तर शहरामध्ये तत्काळ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी देखील केली होती. खासदार सातव यांची केलेली मागणी तसेच हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये असलेला तुटवडा बघता पालकमंत्री गायकवाड यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना शहरामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या सुचना देखील केल्या आहेत.
या निर्णयाने कोरोना संसर्गाने उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना फायदा होणार आहे. ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या खुपच झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही, तसेच रुग्णांचा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर उभारण्याच्या सुचना देखील या वेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांची मानसिकता तपासण्याची गरज : खासदार डॉ. भागवत कराड
- शहरात जोरात नाका बंदी तरीही तीन दुचाकी चोरीला
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- विद्यार्थिनीने फी न भरल्याचे सोशल मीडियावर सांगितले, शिक्षिकेवर अॅट्रोसिटी
- लवकरच पुरेसा रेमडेसिवीरचा साठा होणार उपलब्ध, सात रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांशी चर्चा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

