नांदेड: राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेड, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेड,रेमडिसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे तसेच प्रशासनावर ताण पडत आहेत. त्यातच नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी हल्लाबोल केला आहे. पुणे आणि जालना जिल्ह्यात लसीचा पुरवठा मुबलक आहे, कारण तिथले पालकमंत्री सक्षम आहेत, असे खा. चिखलीकर म्हटले असुन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे राज्य सरकारमध्ये वजन नाही. त्यामुळे नांदेडला मुबलक लस मिळत नाही.त्यातल्या त्यात कोरोना महामारीत नांदेड अव्वल स्थानी आहे . यास जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाणांना लसीची माहिती नाही ते बालीश असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने खा. प्रतापराव चिखलीकर लोहा येथे गरजूना वा कोविड रुग्ण व नातेवाईकांना दररोज १०० जेवणाचे डब्बे देण्याचा भाजपा पदाधिकारी व व्यापारी मित्रपरिवाराने सुरु केलेल्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी खा. चिखलीकर बोलत होते. लोहा पॅटर्नची जिल्ह्याच्या अन्य भागातही गरज आहे. तेथेही भाजपा कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे ते म्हणाले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
खा. चिखलीकर यांनी यावेळी असे अवाहन केली की, सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन कमी पडणार नाही असेही त्यांनी आश्वस्त केले.
कोविड सेंटरला बाजुच्या आयटीआय येथून पाणी आणले जाते. येथे बोअरची गरज आहे असे डॉ.मोटे यांनी खा. प्रतापराव पाटील यांना सांगताच तात्काळ पाणी पाहून बोअर मारा, मी स्वत: त्याचे पैसे देतो तसेच मोटर टाकून देतो, अशी ग्वाही चिखलीकरांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भुसावळमध्ये पहिल्यांदाच तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल
- ‘…पण रक्ताचं नातं गमावलेल्यांसाठी या यंत्रणेकडे शेवटपर्यंत तरी उत्तर असेल?’
- बेशिस्तांवर कारवाईसाठी पोलिसांचा नवा फंडा ,तृतीयपंथींची फौज तैनात
- ऑक्सिजन टँकमुळे घाटीत वाढणार २०० बेड
- नांदेड येथे आयपीएलवर सट्टा लावणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
