उस्मानाबाद : ‘सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासनं देत नाही आणि मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे तसेच ‘ महाविकास आघाडी सरकार ‘च्या कारभाराचे कौतुक केले आहे. उस्मानाबाद दौऱ्यावर आलेल्या मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘मृत्यू दर रोखणे महत्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको’
राज्यातील करोना संसर्ग आणि त्याअनुशंगाने सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना याविषयी त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत आपली मते मांडली. करोनासारख्या महासंकटात सरकार व प्रशासन अत्यंत योग्यप्रकारे स्थिती हाताळत असल्याचे त्या म्हणाल्या. करोना संसर्गाशी सध्या प्रशासन झुंजत आहे. या स्थितीत सरकारने कायद्यानुसार आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी सरकारने केलेले आवाहन जनतेनेही ऐकावे, असे पाटकर यांनी नमूद केले.
‘बॅकलॉक व ATKTच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांसोबत ही तर ‘हेराफेरी’
‘हे संवादी सरकार असून करोना सारख्या संकटात आक्रस्ताळेपणा न दाखवता संयमाने परिस्थिती हाताळली जात आहे’, असे नमूद करत पाटकर यांनी सरकारचे कौतुक केले. सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासने देत नाही किंवा मुख्यमंत्रीही ‘अॅरोगंट’ नाहीत. अनेक वर्षांनंतर राज्याला असे सरकार मिळाले आहे. मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधताना आश्वासक आणि ठाम वाटत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेलाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असे सांगतानाच हे संवादशील सरकार असल्याने ते संवेदनशील असेल ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, राज्य सरकारचं कौतुक करताना मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारला मात्र लक्ष्य केले. केंद्राच्या धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली.


