🕒 1 min read
नवी दिल्ली : जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, जग चीनशी व्यवहार करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे भारतीय उद्योगांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हा एक आहे एक छुपा आशीर्वाद आहे. आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. न्यू इंडियामधील स्वावलंबी भारत या विषयावर वेबिनारला संबोधित करताना गडकरी बोलत होते
जीडीपी, कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. “ईझ ऑफ डुइंग बिझिनेसमध्ये वर्ल्ड बँकेने निश्चितच आमची रँक वाढविली आहे, परंतु क्लियरन्स, प्रमाणपत्र आणि अनुपालन प्रक्रिया खूप जटील आहेत. आम्ही सर्व सिस्टम डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. जीडीपी, कृषी विकासदर आणि ग्रामीण उद्योग विकास वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरांनी सांगितलं आहेत.
…मग संघाचा रेशीमबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित का झाला, कॉंग्रेस नेत्याचा सवाल
पुढील पाच वर्षांत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे उत्पन्न १ लाख कोटी रुपयांवर नेण्याची योजना आहे. एनएचएआयमध्ये सध्या आपण दरवर्षी 28,000 कोटी रुपये कमवतो आणि येत्या पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये घेण्याची माझी योजना आहे. मी सरकारच्या बजेटवर पूर्णपणे अवलंबून नसल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
Exam Update: विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ चा शिक्का!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

