औरंगाबाद: औरंगाबादकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी(Nitin gadkari) यांनी लातूर येथे औरंगाबादमध्ये नागपूरच्या धर्तीवर तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामात अत्याधुनिक तसेच जागतिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. लवकरात लवकर या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येईल. अशी ग्वाही गडकरी यांनी लातूरमध्ये बोलतांना दिली.
लातूर जिल्ह्यातील १९ महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी औरंगाबाद येथील तीन मजली उड्डाणपुलाची घोषणा केली. शहरातील औद्योगिक परिसर म्हणून ओळख असलेल्या वाळुजपर्यंत हा तीन मजली उड्डाणपूल करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. औरंगाबाद ते वाळूज हा उड्डाणपूल झाल्यास पुणे तसेच नगरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.
तसेच शहराच्या बाहेर राहणार्यांना शहरात येणेही त्यामुळे सोयीचे ठरेल. पुण्यालाही यामुळे जलद गतीने पोहोचता येणार आहे. विशेषतः या उड्डाणपुलावर पहिल्या मजल्यावर आठ पदरी लेन असेल दुसऱ्या मजल्यावर आणखी एक पूल असेल तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो इलेक्ट्रिक वर चालणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती होती. मराठवाड्यासाठी वीस हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील
- ‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’
- औरंगाबादेत जिन्सी प्रकरण रंगले; आजी-माजी प्रशासकांचा पलटवार!
- ‘या’ ठिकाणी आहे ‘देवमाणूस’ मधील डॉ.अजित कुमारचा पुतळा; पाहून बसेल धक्का
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

