Share

संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाची भव्य रॅली

Published On: 

यवतमाळ : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या असल्याचे दिसून येत आहे. पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी भाजप ने केली आहे.तर दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज आक्रमक झालेला आहे.

विरोधकांकडून राठोड यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी होत आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे बंजारा समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप होत आहे. या अनुषंगाने संजय राठोड याच्या समर्थनार्थ महंत आणि बंजारा समाज एकवटला असून बंजारा समाजाने यवतमाळमधील दिग्रस येथे रॅली काढली आहे. तसेच या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदनसुद्धा दिले आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर ऑडिओ क्लीपमधील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे असा दावा अनेकांकडून करण्यात येतोय. भाजपने तर थेट संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या सर्व कारणांमुळे मागील काही दिवसांपासून संजय राठोड चर्चेत आले.

मात्र भाजप तसेच विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज पुढे आला आहे. त्यांनी पूजा चव्हाणला श्रध्दांजली वाहिली. तसेच पोहरादेवी इथल्या सुनील महाराज आणि जितेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली. त्यांनतर महंत सुनील महाराज यांच्या उपस्थित तहसील कार्यालयात तहसीलदारांना राठोड यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!