मुंबई : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत मोठी घसरण होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी तसेच मृद व जलसंधारण या तीन विभागांनी एकत्र मिळून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी अटल भूजल योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज व घराघरात पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने जलधर पुनर्भरण योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. शिवकालीन पाणी साठवण योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भूजल पातळी वाढविण्यासाठी जनतेचा सहभाग घ्यावा, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. जनतेमध्ये जलसाक्षरता व जलजागृती निर्माण करावी असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्याची सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडसंबंधी प्रस्ताव तातडीने सादर करावा.
महत्वाच्या बातम्या
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल – अस्लम शेख
- पीएसआय परीक्षा 2018 संभाव्य प्रतिक्षा यादी मुदतवाढीसाठी प्रस्ताव एमपीएससीकडे सादर करा – दत्तात्रय भरणे
- करून दाखवलं : महाराष्ट्रात कोविडच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक
- भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल अडकला लग्नबंधनात…
- राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, उद्धव ठाकरेंचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

