Share

परीक्षेसंदर्भात राज्यपालांचा आग्रह चुकीचा! पुनर्विचार करण्याचा संजय राऊतांनी दिला सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोरोनाने राजभवनात शिरकाव केला असून 24 कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. हि बाब गंभीर्याने घेतली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर परीक्षा घ्या हा आग्रह चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलंय. त्यामुळे आता परिक्षांसंदर्भात राज्यपालांनी पुनर्विचार करावा, असा सल्ला देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

‘राऊतांनी पवारांची घेतलेली मुलाखत म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’, मुलाखत संपल्यावर मी प्रतिक्रिया देईन’

“परीक्षा घ्या, परीक्षा घ्या… हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आग्रह किती चुकीचा आहे, हे त्यांना नियतीनंच दाखवून दिलंय. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचं का?” असा सवाल करत संजय राऊत म्हणाले की, “हे इश्वरानं दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, इश्वर यांना मानणारे आहेत.” एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असंही राऊत म्हणाले.

प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

तर, याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आक्रमकपवित्रा घेत सद्याची परिस्थिती बघता अंतिम वर्ष परिक्षांविषयी थेट HRD व युजीसीला प्रश्न केले असून राज्यातील गंभीरता लक्षात आणून दिली आहे. दिवसेंदिवस राज्यासह देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून अनेक जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहेत. अशात युजीसीने सप्टेंबर अखेर पर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात असे आदेश दिले असताना, आता हि परिस्थिती बघून तरी युजीसी ला राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्याचा निर्णय पटेल का असे विचारले आहे.

आज उदय सामंत यांनी आता एक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “राजभवनात कोरोना…अमिताभजींना कोरोना.. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला.. आता तरी HRD आणि युजीसी ला पटेल का..कि परीक्षा घेणं म्हणजे माझ्याया विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे..आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का???,” अशा आक्रमक शब्दांत आता त्यांनी सवाल केले आहेत.

अमिताभ-अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!