Share

कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री झालो, राज्यपालांसमोरच उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी

Published On: 

मुंबई : राज्यसरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील संघर्ष आता राज्याला नवा नाही. या संघर्षाचा पुढचा अंक राज्याला राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीवेळी पाहायला मिळू शकतो. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.

मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे. ‘आपण मुख्यमंत्री झालो नसतो, तर नक्कीच एक कलाकार झालो असतो, किंबहुना आपण कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी’

त्यांनतर राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना लगेचच उत्तर देत, ‘राज्याचे मुख्यमंत्री कलाकार आहेत. मला तर ते त्यांची कला शिकवत नाहीत. पण, कदाचित समूह विद्यापीठात येऊन तुम्हाला ते आपली कला शिकवतील’, असा टोला लगावला.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे तर शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे आहे, असे विधान करत राज्यपालांवरच निशाणा साधला.

मुंबई पोलीस होणार आता अधिक गतिमान…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!