🕒 1 min read
Supriya Sule | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, “एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते.”
त्या कामासाठी आम्हाला सर्वांनाही तुरुंगात जावं लागलं तरी चालेल. कारण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. या कामासाठी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तुरुंगात जात असतील, तर जितेंद्र आव्हाडांचा आम्हाला अभिमान असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, जो चूक करतो, त्याला पूर्णपणे माफी मिळते आणि जो एखादं आंदोलन करतो, त्याला शिक्षा दिली जाते. यातून मला ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवले. जितेंद्र आव्हाड हे एक लढवय्ये नेते आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. पोलीस ठाण्यात गेल्यावर कळालं की, पोलिसांवर वरून दबाव येतोय.
पण आता वरून दबाव येतोय म्हणजे कुठून दबाव येतोय? याचं उत्तर माझ्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं. अटकेसाठी दबाव आणल्याबाबत मी कुणावरही आरोप करत नाही. कारण वरून दबाव येतोय म्हणजे यामध्ये बिचाऱ्या पोलिसांची काहीही चूक नाही, असंही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “फाशी दिली तरी चालेल, पण…”; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत प्रतिक्रिया
- Jayant Patil | “शिवरायांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, गुन्हा आहे का?” आव्हाडांना अटकेनंतर जयंत पाटलांचा सवाल
- Snowfall Destination | भारतामध्ये सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Chitra Wagh | “पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात” ; चित्रा वाघ भडकल्या
- Sushma Andhare | “आपला तो फेकू, दुसऱ्याचा तो पप्पू” ; सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
