🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: भारतीय रेल्वे (Indian Railways) ही जगातील चौथ्या क्रमांकावरील सर्वात मोठी रेल्वे आहे तर आशियामध्ये भारताचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेल्वे नेटवर्क मध्ये भारतामध्ये अनेक रेल्वे स्थानक (Railway Station) आहे.
यापैकी प्रत्येक स्थानकाची स्वतःची एक वेगळी खासियत आहे तर काही स्थानिक हे त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे खूप प्रसिद्ध आहेत. यामध्ये काही स्थानके त्यांच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे तर काही धोकादायक रुळांमुळे तर काही खूप लहान आहे म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर यामधील काही स्थानके खूप भीतीदायक (Haunted) आहेत म्हणू प्रसिद्ध आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्याच भीतीदायक स्थानकांबद्दल माहिती सांगणार आहोत.
मुलुंड रेल्वे स्टेशन
मुंबई येथे स्थित असलेले मुलुंड रेल्वे स्थानक भयानक स्थानकांच्या यादीमध्ये येते. या स्थानकावर संध्याकाळी नंतर अनेकदा ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येतात असे येथे राहणारे लोक सांगतात. त्यामुळे या स्थानकावर रात्री लोक येण्याचे टाळतात.
चित्तूर स्टेशन
आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर येथील रेल्वे स्थानकाच्या देखील अनेक भयानक कथा प्रचलित आहे. हरिसिंग नावाचा सीआरपीएफ अधिकारी या स्थानकावर उतरला होता त्यानंतर तेथील आरपीएफ जवानाने टीटीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये तो ठार झाला. तेव्हापासून त्या त्याची आत्मा या स्टेशनवर न्यायाच्या शोधात भटकत असते असे तेथील स्थानिकांचे मत आहे.
बरोग स्टेशन
हिमाचल प्रदेश राज्यातील सोलर जिल्ह्यामध्ये बरोग स्टेशन स्थित आहे. रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर असून निसर्ग सौंदर्याचा सुंदर नजरांना येथे तुम्हाला बघता येईल. पण या स्टेशनवर रात्रीच्या वेळी भूत दिसतात असे देखील म्हणतात. या ठिकाणी देखील अनेक भुताच्या कथा प्रचलित आहे. बरोद बोगदा ब्रिटिश ऑफिसर कर्नल बरोद यांनी बांधला होता. काही कारणावरून त्यांनी त्या बोगद्याच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून स्थानिकांची अशी मान्यता आहे की या रेल्वे स्टेशनवर त्यांचा आत्मा भटकत असतो.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | “फाशी दिली तरी चालेल, पण…”; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत प्रतिक्रिया
- Jayant Patil | “शिवरायांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, गुन्हा आहे का?” आव्हाडांना अटकेनंतर जयंत पाटलांचा सवाल
- Snowfall Destination | भारतामध्ये सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Chitra Wagh | “पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात” ; चित्रा वाघ भडकल्या
- Sushma Andhare | “आपला तो फेकू, दुसऱ्याचा तो पप्पू” ; सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
