लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर परिस्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये एवढी मदत तातडीने करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.
आमदार निलंगेकर म्हणाले की, ‘मराठवाड्यात गेल्या १५ दिवसांत अतिवृष्टीमुळे २५० मंडळात शेकडो लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. अनेक पक्की घरे पडली आहेत, खरिपाचे पीक १००% वाया गेले आहे, सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली आहेत. एवढी भयानक परिस्थिती मराठवाड्याने आजवर कधीही अनुभवली नव्हती. खरे तर ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत द्यायला हवी होती. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याची महाविकास आघाडी सरकारची इच्छाच नाही असे दिसून येते.’
मागील वर्षी सुद्धा झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. निदान यावर्षी तरी राज्य सरकारने पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत न ठेवता शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत, पोहोचवून त्यांना संकटमुक्त करावे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामे व नुकसानीच्या अहवालांची वाट न पाहता मदत जाहीर करावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्तार म्हणतात… खासदार इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याचा पापाचा मी ही भागीदार!
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

