Share

‘कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यास सुरवात’: हसन मुश्रीफ

Published On: 

पुणे : कोरोनामुळे असंघटीत कामगारांचे, मजुरांचे आणि ऊस तोड कामगारांचे हाल होत आहेत. या कामगारांनी आपल्या घरी जाण्याची सोय करा अशी मागणी सरकारकडे केली होती. अनेक ऊसतोड कामगार हे कोल्हापूरमध्ये अडकले आहेत. मात्र आता सरकारने निर्णय घेत या कामगारांना घरी जाण्याची व्यवस्था केली आहे.

कोल्हापूरमध्ये अडकलेल्या ऊस तोड कामगारांवर शुक्रवारी पाऊसाने झोडपले होते. त्यांच्याकडे असणाऱ्या अन्न धान्याचे नुकसान झाले. यावर सर्वांनीच सरकारला निर्णय घेण्याची मागणी केली. भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऊस तोड कामगारांना घरी जाण्याची सोय करावी अशी विनंती केली.

आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्वीटरवर माहिती दिली आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. ते ट्वीटरवर म्हणाले,

‘महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे अडकलेल्या ऊसतोड बांधवांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!