Share

‘सरकारने ९७% कुटुंबांचे उत्पन्न कमी केले पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहे. तसेच वाढत्या इंधन दरवाढीवरून अनेक भागात आंदोलन देखील करण्यात येत आहे. याबाबत आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

प्रियांका गांधीनी ट्विटमध्ये म्हंटले की, ‘जेव्हा तुम्ही दररोज महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा, मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेल्या करातून 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. रोज महाग तेल-भाज्या विकत घेताना लक्षात ठेवा. या सरकारने 97% कुटुंबांचे उत्पन्न कमी केले पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात,’ अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, वाढत्या इंधन दरवाढीपासुन नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. यातच आज पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या दरांनुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.89 आणि 95.62 रुपये इतका आहे. तर मुंबईत पेट्रोल 112.78  रुपये , डिझेल 103.63 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहचले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!