Share

मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सईद शूजा या अमेरिकन हॅकरने केलाय. विरोधकांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, कथित अमेरिकन हॅकरने केलेल्या दाव्यानंतर भारतात खळबळ माजली आहे.

गोपीनाथ मुंडेंबाबत होणारे हे आरोप धक्कादायक आहेत. याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी. चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करायला हवा. लोक मुंडेंबाबत असंच कुजबुजत होते. मात्र, आता झालेला आरोप धक्कादायक आहे. म्हणून सगळे पक्ष मतदार पत्र परत आणा म्हणत असताना भाजप ईव्हीएमवर ठाम आहे, असं माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

काय आहे प्रकरण ?

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरनं केला आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच पिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.

सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा कर्मचारी होता असं त्यानं म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरनं केला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच पिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!