Share

सांगलीत होणार तिरंगी लढत, गोपीचंद पडळकर आंबेडकरांच्या भेटीला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनाचे नेतृत्व पडळकर यांनी केलेले आहे.

सांगली मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील उमेदवारी मिळाली आहे. गोपीचंद पडळकर यांना जर उमेदवारी मिळाली तर सांगलीतील तिरंगी लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. गोपीचंद पडळकर हे ३ एप्रिलला अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच ते आज आंबेडकरांची भेट घेणार असल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधान आलं आहे. तसेच सांगलीतून पडळकर लढणार का? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

वंचित बहुजन आघाडीने सांगलीचा उमेदवार आधीच घोषित केला आहे. तसेच सांगलीचा उमेदवार बदलणार नाही असं आंबेडकरांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या भेटीत काय चर्चा होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे पडळकर यांच्या भेटीने आंबेडकर सांगलीचा उमेदवार बदलतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!