Share

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवयच आहे – पडळकर

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

पदवीधर ही निवडणुक भ्रष्टाचारा विरोधातील आणि प्रखर जातीय वाद्याच्या विरोधातील निवडणूक आहे. तर या टग्यांच्या सरकार विरोधातील ही निवडणूक असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगली मध्ये पदवीधर निवडणुकीच्या मेळाव्यात बोलत होते.

बिहार निवडणुकीत सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते म्हणाले मोदींच्या नेतृत्व लोकांनी नाकारले. निकाल नंतर म्हणू लागले आम्हाला आत्मचिंतन करावे लागेल. हे लोकं कपडे नवीन शिवून बसले होते. दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं याचं काम आहे.बिना सुपारीचे हे लोकं नाचत असतात. नटून थटून सकाळी बसले होते. यांना भाजपच्या विरोधात बोलायचं होता मात्र त्यांना ते जमल नाही.बिहारच्या जनतेने मोदींच्या बाजूने निकाल दिला आणि यांना दिवाळी दिवशी शिमगा करायची वेळ आली आणि यांना बोंब मारावी लागली अशी टीका ही  गोपीचंद पडळकर यांनी केली.

दरम्यान, ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता असं देखील गोपीचंद पडळकरांनी विचारले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!