पुणे- अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणे उर्फ गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.धक्कादायक बाब म्हणजे, अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.
विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गजानन मारणे हा सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव होता. त्यानंतर त्याच्या सर्वगाड्या एकामागोमाग एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाल्या. एरवी टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनांना सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्यांचे दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या.
उर्से टोल नाका येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला असल्याचे बोलले जात आहे. तिथे फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या संपूर्ण प्रकाराचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले असल्याची देखील चर्चा आहे.दरम्यान, आता या प्रकरणी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पकडलेले साक्षीदार खटल्याच्या सुनावणीत टिकू शकले नाहीत.यानंतर दोन्ही खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- धुळ्यासाठी २१० कोटींचा प्रारुप आराखडा मंजूर-अब्दुल सत्तार


