Share

खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढीमुळे सोयाबीनला चांगला भाव- पाशा पटेल

Published On: 

मुंबई  : केंद्र शासनाने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमाल पातळीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळणार असून त्याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. यासंदर्भात केंद्र शासनाकडे सातत्याने मागणी केली होती, अशी माहिती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज दिली.

यासंदर्भात माहिती देताना श्री. पटेल म्हणाले, एप्रिल महिन्यात बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. परंतु तांत्रिक कारणांनी हा भाव कोसळला. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पाशा पटेल यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्री पीयुष गोयल व केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू तसेच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या भेटी घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. यासर्व बाबी केंद्र सरकारच्या सचिव गटासमोर सादर करण्याच्या सूचना त्यांना संबधित केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या. त्यानुसार नुकत्याच झालेल्या केंद्रीय सचिव गटाच्या बैठकीत हा विषय सादर करण्यात आला.

त्यानंतर केंद्र सरकारने दि. 14 जुन 2018 रोजी पाशा पटेल यांनी सुचवलेल्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार खाद्यतेलावर आयातशुल्क कमाल पातळीपर्यंत अर्थात 45 टक्के एवढे वाढविण्यात आले आहे. गेल्या दहा महिन्यात चौथ्यांदा केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केली आहे.

केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चांगला भाव मिळणार असल्याने सोयाबीनचा पेरा वाढणार आहे, असेही श्री.पटेल यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!