Share

खुशखबर! केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये केली वाढ

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट, पावसाच्या पुराचा फटका, खतांसाठी करावी लागणारी कसरत, दूध दरवाढीला होणारा विलंब अशा अनेक आर्थिक फटक्यातून जात असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला आहे.

आज, केंद्र सरकारने ऊसासाठीचा एफआरपी १० रुपयांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता प्रति क्विंटल २८५ रुपये दर करण्यात आला आहे. हा दर ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणाऱ्या विपणन वर्षासाठी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या आर्थिक समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या विपणन वर्षासाठी हे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव या समितीपुढे मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय : जिल्हाबाह्य एसटी वाहतुकीला राज्य सरकारची परवानगी

पूर्वी हा दर प्रति क्विंटल २७५ रुपये इतका होता. तो आता १० रुपयांनी वाढवण्याची शिफारस मान्य केल्यानंतर २८५ रुपये इतक्या किमान किफायतशीर दराची निश्चिती येणाऱ्या विपणन वर्षासाठी लागू करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित केले. केंद्र सरकारचे कृषी अयोग हा दर ठरवत असते. या दराहुन जास्त दर द्यायचा असल्यास राज्य सरकार किंवा साखर कारखाने तशी तरतूद करू शकतात.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून काँग्रेस नेत्याने ठाकरे सरकारला सुनावले खडेबोल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!