टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रासह देशातील वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवणे आता सोपे होणार आहे.
केंद्र सरकारने आर्थिक गरिबांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ९७० नव्या जागा आल्या आहेत. राज्यातील २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या जागा वाटल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, १० टक्के आरक्षण लागू करण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्याची गरज होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. उपलब्ध जागांपेक्षा खूप अधिक प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतील, तर विशेष परिस्थितीत सरकार जागा वाढविण्याचा निर्णय घेते. त्याचप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

