Share

चित्रपट प्रेमीसाठी खुशखबर, लवकरच सुरु होत आहे ‘पिफ’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या व दरवर्षी चित्रपट प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पहात असतात त्याची घोषणा झाली आहे. अर्थात दरवर्षी पुण्यात होणारा पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यावर्षी ९ ते १६ जानेवारी, २०२०मध्ये होणार आहे. या कार्यकमाची माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’ असून या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यावेळी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने देखील महोत्सवा अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे’.

यावेळी महोत्सवासाठी यावर्षी ६० देशांमधून तब्बल १९०० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक १९१ चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवा दरम्यान चित्रपट रसिकांना मिळणार आहे. पुण्यात ४ ठिकाणी ८ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यामध्ये पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), आयनॉक्स, बंड गार्डन रस्ता आणि पीव्हीआर पॅव्हेलियन, सेनापती बापट रस्ता या चित्रपटगृहांचा समावेश आहे.

पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे व अभिजित रणदिवे आदी यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1204025933968969728?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204024928124538881?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204024580920053761?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!