Share

हरिभाऊंना अभय; मुख्यमंत्र्यांनी काढली विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावातील हवा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज नाट्यमय घडामोडी घडल्या. विरोध पक्षांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावावर चर्चा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. या ठरावाला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केला असून सरकारने पळपुटेपणा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष असतानाही एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाप्रमाणे वागत असून मनमानीपणे कामकाज रेटत आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सदस्यांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्नही करत आहेत, आदी कारणे देत विरोधकांनी बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. विधानसभा नियमानुसार येत्या दोन आठवड्यात अध्यक्षांचा अविश्वास प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येईल. मात्र तत्पूर्वी अध्यक्षांनी नैतिकता दाखवून सभागृहात कामकाज करू नये. त्यांच्याजागी तालिका अध्यक्ष कामकाज करू शकतात. याबाबत बागडे यांनी सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या बाजूने आज विश्वास ठराव आणून विरोधकांवर कुरघोडी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!