🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या वेगवेगळ्या देशाच्या दौऱ्यावर आहे. एक संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे तर दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ हा तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.
यादरम्यान भारतीय रसिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे प्रसारण हे सोनी नेटवर्कशीवाय डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवरसुद्धा होणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांना या मालिकेचा अस्वाद मोफत घेणार आहे. १३ जुलै रोजी या मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेचा संघ हा नुकताच इंग्लंडचा दौरा संपवुन मायदेशी परतला आहे.
इंग्लंडच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना हॉटेलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ काहीदिवसापुर्वीच श्रीलंकेत दाखल झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाची धुरा शिखर धवनकडे देण्यात आली आहे. तर प्रशिक्षक पद राहुल द्रविडकडे सोपवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- इतर पक्षातून आलेल्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी; निष्ठावंतांचे पंख छाटले
- देवेंद्र फडणवीसांशी असणारी मैत्री कपिल पाटील यांच्या पथ्यावर पडली
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
