Share

आनंदाची बातमी : राज्यात ८६ हजार ५७५ कोरोनाचे रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

‘विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोनामुक्तीची’, पांडुरंगाला गृहमंत्र्यांचे साकडे

राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

असा घडणार नवा महाराष्ट्र ? युवासेना जिल्ह्याध्यक्षाचा भाऊ खंडणी घेताना रंगेहात सापडला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!