Share

असा घडणार नवा महाराष्ट्र ? युवासेना जिल्ह्याध्यक्षाचा भाऊ खंडणी घेताना रंगेहात सापडला

Published On: 

नागपूर : शिवसेनेच्या युवासेनेचा जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड याचा भाऊ संजोग याला खंडणीच्या हप्त्याचे पाच लाख रुपये घेताना शनिवारी सायंकाळी पोलिसांनी पकडले. विक्रमने एका सावकाराकडे खंडणी मागितली होती. विक्रम फरार आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

ठाकरे सरकार मोफत उपलब्ध करून देणार कोरोनावरील ‘हे’ औषध ?

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम मानेवाडा भागात राहतो. याच परिसरात एका सावकाराची ‘फायनान्स कंपनी’ आहे. त्याचे ऑफिस नंदनवन येथे आहे. विक्रम सावकाराला धमक्या देत होता की, तू अवैध सावकारी करून अनेकांच्या जमिनी हडपल्या आहेत. तुझ्यावर कारवाई करू. तुझी दुकानदारी बंद पाडू. विक्रम सावकाराकडे खंडणी मागत होता. आता, १५ लाख रुपये दे, नाही तर मुंबईत जाऊन एका दिवसात तुझे ऑफिस बंद करतो, अशी धमकी विक्रमने दिली. सावकार आठ लाख रुपये देण्यास तयार झाला. हे पैसे लवकर दे म्हणून दोन दिवसांपासून विक्रम सावकाराच्या मागे लागला होता. आजच पैसे दे, नाही तर तुझा ‘गेम’ करतो, अशी धमकी विक्रमने सावकाराला दिली.

शनिवारी दुपारी विक्रमविरुद्ध तक्रार करण्यासाठी सावकार अजनी पोलीस ठाण्यात गेला असतानाच, आताच पैसे दे असे धमकावण्यासाठी विक्रमचा सावकाराला फोन आला. बँक बंद असल्यामुळे पैसे देता येणार नाही, असे सावकाराने विक्रमला सांगितले. यावर आज ५ वाजेपर्यंत पाच लाख रुपये दे आणि राहिलेले तीन लाख सोमवारी दे, असे सांगून सावकाराला धमकावत विक्रमने त्याला शिव्या दिल्या. सावकाराच्या फोनवरचे हे बोलणे ठाणेदार संतोष खांडेकर आणि ठाण्यातले सर्व लोक ऐकत होते. पोलिसांनी सावकाराची तक्रार नोंदवून घेतली आणि विक्रमला पकडण्यासाठी सापळा रचला.

खंडणीचे पाच लाख रुपये कुठे द्यायचे, असे फोन करून सावकाराने विक्रमला विचारले. पैसे घेऊन मेडिकल चौकात ये, असे विक्रमने सांगितले. सावकार मेडिकल चौकात गेल्यानंतर विक्रमने त्याला जवळच्या शाळेकडे बोलावले. शाळेजवळ जाऊन सावकाराने विक्रमला फोन केला. विक्रमने सांगितले, माझा माणूस कारने येतो आहे. त्याने सावकाराला कारचा नंबर सांगितला. सायंकाळी ५.३० च्या सुमाराला एक कार येऊन सावकाराजवळ उभी राहिली.

‘नरेंद्र मोदींनी मन की बात ऐवजी लडाख की बात केली असती तर बरं झालं असतं’

कारमध्ये विक्रमचा मोठा भाऊ संजोग होता. ओळख पटवून देत संजोग सावकाराकडून पाच लाख रुपये घेत असताना अजनी पोलिसांनी संजोगला कारसह ताब्यात घेतले. विक्रम आणि संजोग राठोड या दोन्ही भावांविरुद्ध खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल केला. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या झेंड्याखाली वेगवेगळे आंदोलन करून विक्रम प्रसारमाध्यमांमध्ये नेता म्हणून चमकत होता. काल पोलिसांनी खंडणी उकळण्याच्या आरोपात त्याला अटक केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!