Share

स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी गोंदियातील नेत्यांनी घेतली ‘या’ मंत्र्याची भेट

Published On: 

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाधितांच्या उपचार आणि सोयी-सुविधांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेवून समस्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन दिले.

ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसगार्ला घेवून चिंतेत भर टाकणारे ठरले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे बाधितांच्या आलेखानुरूप रूग्णांच्या मृत्यूचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाने जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रूग्णसेवेला घेऊन प्रश्न उपस्थित केले जात आहे.

या बाबीची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेवून जिल्ह्यातील परिस्थितीवर चर्चा केली. दरम्यान, समस्या निदर्शनास आणून दिल्या. यावर उपाययोजना कराव्यात, रूग्णालयात औषधी, ऑक्सीजन व रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन दिले. यावर पालकमंत्री देशमुख यांनी यंत्रणेला निर्देश देवून तत्काळ व्यवस्था करण्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!