टीम महाराष्ट्र देशा : इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करा. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील, असा दावा संभाजी भिडे यांनी केला आहे.
ते म्हणाले ‘गोमूत्र आणि गायीचं तूप हे अतितीव्र जंतुनाशक आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाधित रुगणांवर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. गाईच्या तुपाने भरलेल बोट नाकात फिरविल किंवा गाईचे गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांच्या खाण्यापिण्यातसुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.
तसेच कोरोनासाठी चीनला जबाबदार धरत ते म्हणाले, चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे. चीन मेला काय, जगला काय बघू नये, चीनशी संबंध तोडावेत, असंही भिडे म्हणाले.’चीनचा हलकटपणा जाईल अस मला वाटत नाही. चीनचा हलकटपणा जायचा असेल, तर चीनवर अत्यंत कठोर पावले उचलली पाहिजेत. चीनला सर्व जीवनावश्यक मार्गाने संपवले पाहिजे, असही संभाजी भिडे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

