मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. श्रावण हा महिना हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच आता सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत वाट पहावी लागेल असं स्पष्टपणे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सरकारने मंदिरांच्या बाबतीत घेतलेल्या या भूमिकेवर भाजपकडून सातत्याने टीका होत आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारला डिवचले आहे. सबंध देश ७५ वा स्वातंत्र्य दिन अभिमानाने साजरा करत असताना ठाकरे सरकारने मात्र देवी-देवतांना बंदिस्त करुन ठेवलेले असणं हे फारच दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातले देव आणि भाविक-भक्त आजही पारतंत्र्यात आहेत. ठाकरे सरकारकडे थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर ७५ व्या स्वातंत्र्य दिनी तरी म्हणजेच १५ ऑगस्टला मंदिरं खुली करुन आमच्या देवांना स्वतंत्र करावं असं भोसले यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

