मुंबई :कोरोनाच्या भीतीने अनेक खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद केली आहेत. त्यामुळे इतर आजारांवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. मात्र राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांना वारंवार आवाहन करून देखील अनेक ठिकाणी रुग्णालय बंद असल्याचं दिसत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. असं न होण्यासाठी डॉक्टरांनी दवाखाने उघडावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
ते म्हणाले की, पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा केमिस्टच्या दुकानांमधून पीपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. कोरोना या आजारा व्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरु ठेऊन रुग्ण सेवा करावी.
प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी औषध प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या उपचारासाठी प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी केंद्राकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने मिळवून देण्यात औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन सर्व परवानगी केवळ दोन दिवसात मिळवून दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन, संपूर्ण सुरक्षितता बाळगून, फक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. त्यामुळे सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरं घ्यावी, असेही आवाहन शिंगणे यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
#राजकारण : पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॉंग्रेसच्या बैठकीला हजर राहणार
केंद्राने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास नाही का ? : पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

