Share

अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना जसा न्याय दिला तसा आम्हालाही न्याय द्या; ढवळे कुटुंबियांची मागणी

Published On: 

उस्मानाबाद : अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना जसा न्याय दिला तसा आम्हाली न्याय द्या, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातले मृत शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुंटुबियांची आहे. दिलीप ढवळेंसह 16 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून परतफेड न केल्याचामुळे दिलीप ढवळे यांनी 12 एप्रिल 2019 या दिवशी पहाटे पाच वाजता आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी दिलीप यांनी सेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आपले आयुष्य संपविले होते.

तेरणा कारखान्याने कर्जापोटी दिलीप ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास लावून आपले जीवन संपविले .

ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी दि. १२ एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी हे टोकाचे पाउल उचलले होते.त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!