Share

शहरातील २० वर्षे जुन्या वसाहतींना पीआर कार्ड द्या’

Published On: 

औरंगाबाद : शहरात सोमवारी डझनभर मंत्री आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना पीआर कार्ड देण्यात यावे तसेच इतर नागरी सुविधा या परिसरात देण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले गेले.

राज्य सरकारने नुकताच शहरातील गुंठेवारी भागातील नागरिकांना पीआर कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आंदोलकांनी टिका केली. शहरातील आंबेडकरनगर, उस्मानपुरा, घाटी झोपडपट्टी, सिद्धार्थनगर, नारेगाव, ब्रिजवाडी, मिसारवाडी या परिसरातील रहिवासी २५-३० वर्षांपासून राहतात. राज्य सरकारने या परिसराला स्लम एरिया म्हणून घोषित केले. या परिसरांना डावलून १० वर्षांपूर्वी वसलेल्या गुठेंवारी विभागातील नागरिकांना पीआर कार्ड देण्यात येणार आहे.

याच धर्तीवर स्लम एरियातील मुस्लिम, मातंग, बौद्ध, ओबिसी समाजातील नागरिकांना बांधवानाही पीआर कार्ड मिळावे. हे नागरिक या परिसरात ३०-४० वर्षांपासून राहतात. या नागरिकांना जर पीआर कार्ड देण्यात आले नाही तर आम्ही शहरात कुणालाही पीआर कार्ड मिळु देणार नाही असा इशारा बसपाच्या वतीने देण्याता आला. यावेळी पंडित बोर्डे (प्रदेश महासचिव), सचिन बनसोडे( प्रदेश सचिव), नदीम चौधरी( प्रदेश सचिव), समाधान जाधव (जिल्हाध्यक्ष), महिंद्र सोनवणे, बाबासाहेव पगारे, शंकरमामा चौथे, विजय बचके, अमोल पवार, अजय यादव, कुणाल लांडगे इत्यादींनी सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!