Share

‘बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात…’ ; अभिनेते हेमंत ढोमेंची प्रतिक्रिया

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा  – राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशानस, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी हे दिवस रात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या करोना योद्ध्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत आहेत.

अशीच घटना पिंपरीतील काळेवाडी येथे घडली ज्यात पोलिसांना मारहाण करण्यात आली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, काळेवाडी परिसरात सोमवारी (२७ एप्रिल) संध्याकाळी ही घटना घडली आहे. गर्दी झाल्याची माहिती समजल्याने तेथे जाऊन फळविक्रेत्याला आणि लोकांना हटकणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शंकर विषंभर कळकुटे या पोलिस कर्मचाऱ्याने याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर युनूस अत्तार, मतीन युनुस अत्तार (पोलिस कर्मचारी), मोइन युनुस अत्तार या तिघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता हेमंत ढोमे यांचा संताप –

आता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्यावर संतप्न प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटमध्ये हेमंतने ‘बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!’

https://twitter.com/hemantdhome21/status/1254890291149991937

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!