🕒 1 min read
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिली आहे. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. चंद्रकांत पाटीलांच्या गाव जेवणाच्या ऑफर ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सांगली महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन, अशी ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपने कंबर कसली आहे. भाजपने या निवडणुकीत आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार या प्रमुख नेत्यांना प्रचारात उतरवलंय. भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभामुळे देगलूरमध्ये आता रंगत येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- पात्रता नसताना सत्ता आल्याने जयंत पाटलांचे ताळतंत्र सुटले- भाजपची टीका
- ‘पंतप्रधानांनी ‘थाळ्या वाजवा कोरोना पळवा’ संदेश दिला होता पण..’,’शिवसेने’चा मोदींवर निशाना
- ‘भाजपाच्या थयथयाटामुळे नाही, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावर मंदिरे उघडली’
- ‘महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या’, उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका’
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत

