टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी 20 हजार कोटींचा निधी दिला जावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नितीन गडकरी यांनी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्या वतीने अशोक चव्हाण चर्चेत सहभाग घेतला होता.
“राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा,” अशी मागणी अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींकडे केली.
“राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु अनेक ठेकेदार वेळेवर काम करत नाहीत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. जे ठेकेदार वेळेत काम करत नाहीत त्यांची कामे रद्द करावीत व त्यांना काळ्या यादीत टाकावे,” अशीही मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली
. “राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने होण्यासाठी व येणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समितीचे गठण करण्यात यावे व त्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्यावी,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
“महाराष्ट्रातील अंकलेश्वर-चोपडा-ब्राहणपुर-देवराई-शेवगांव-नेवासा-संगमनेर, कोल्हापूर-महाबळेश्वर-शिरूर, सागरी मार्ग-खोल-अलिबाग-रत्नागिरी-वेंगुरला-रेड्डी-गोवा या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाची मान्यता देण्यात यावी,” अशीही मागणी यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.
#राज्यातील राष्ट्रीय #महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांची मागणी #सार्वजनिकबांधकाम मंत्री तथा नांदेडचे #पालकमंत्री@AshokChavanINCयांनी केंद्रीयमंत्री @nitin_gadkariयांच्याकडे केली,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी #दिल्ली मधून #व्हिडीओकॉन्फरसिंगद्वारे संवाद pic.twitter.com/xRM8ns28Bz
— District Information Office, Nanded (@InfoNanded) April 28, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

