टीम महाराष्ट्र देशा:-विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेची युती होणार असली तरी अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे ५०:५० चा विषयच येत नाही असे म्हणत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी युती फॉर्म्युल्यासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लावला आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल. उगाच कोणी त्यात मत मांडू नये, असाही ते यावेळी म्हणाले
दरम्यान लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप-सेनेची युती व्हावी, अशी दोन्ही पक्षांतील नेत्यांची इच्छा आहे. मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आदींसमवेत चर्चा सुरू आहे. राज्यातील २८८ जागांपैकी भाजपचे १२३ तर शिवसेनेचे ६२ आमदार आहेत. त्यामुळे काही जागांबाबत मतभेद असले तरी लवकरच तोडगा निघेल. मात्र, युतीला कुठलाही धक्का पोहोचणार नाही. जागावाटपाबाबत शहा, फडणवीस व ठाकरे ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल, असेही गिरीश महाजन म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

