Share

Winter Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ 3 गोष्टींचा आहारात समावेश करून, सांधेदुखी पासून मिळवा आराम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: देशातून परतीच्या पावसाने माघार घेताच सर्वत्र थंडी (Winter) ची हुडहुडी वाढत चालली आहे. हिवाळा आपल्या सोबत अनेक आरोग्याच्या समस्या (Health Problem) घेऊन येतो. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला त्वचा (Skin), शरीर (Body),आणि सांधेदुखी (Joint Pain) च्या समस्येला सामोरे जावे लागते. वयाबरोबर लोकांना संधिवाताचा त्रास होऊ लागतो. मात्र हिवाळा सुरू होतात सांधेदुखीचा त्रास अधिक जाणवायला लागतो. थंडीमुळे हाडे व गुडघे दुखू लागतात. हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यावर सांधेदुखीचा त्रास सुरू व्हायला लागतो.

आरोग्य तज्ञांच्या मते, भारतामध्ये दर पाच पैकी एकाला संधिवाताच्या त्रासाला सामोरे जावे लागते. पूर्वी फक्त हा आजार वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता पण आता हा त्रास तरुणांमध्येही दिसायला लागला आहे. या त्रासामुळे चालणे आणि शरीराचे हालचाल करणे कठीण होते. मात्र अनेक घरगुती उपाय करून आपण सांधेदुखीचा आजार बरा करू शकतो. आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला हिवाळ्यामध्ये सांधेदुखीच्या आजारावर कसे नियंत्रण ठेवायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

हिवाळ्यामध्ये (Winter) सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा

लसूण

हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात लसणाचा समावेश करा. कारण लसणामध्ये आढळणारे सल्फर आणि अँटी-ऑक्सीडेंट घटक सांधेदुखी पासून आपल्या शरीराला आराम देऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन-तीन पाकळ्या खाल्ल्यास तुम्हाला सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

धने

धन्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-अँटॅक्सीडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे धने हे सांधेदुखीच्या त्रासावर उत्तम उपाय ठरू शकते. सांधेदुखीच्या रुग्णांनी धने पाण्यात भिजवून ते पाणी प्यावे. त्याचबरोबर तुम्ही धने पावडर टाकून देखील पाणी पिऊ शकता. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला सांधेदुखी पासून आराम मिळू शकतो.

मेथी

तुम्हाला जर सांधेदुखी पासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही मेथीचे सेवन केलेच पाहिजे. मेथी मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात. त्याचबरोबर मेथी मध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आढळते. ज्यामुळे सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. सांधेदुखीच्या रुग्णांनी दोन चमचे मेथी पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. हे पाणी तुम्ही रिकाम्या पोटी चहा सारखे देखील पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखी पासून आराम मिळेल.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!