Share

Abdul Sattar | “… तर मी राजीनामा देईल”, म्हणत अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंना दिलं आव्हान

Published On: 

Abdul Sattar | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने राज्यातील शेतकरी हाल झाला आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय करत आहेत, असं म्हणत विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. यावर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनाही चॅलेंज दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. पण, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांची जलील यांच्यामार्फत मीच विकेट घेतली होती. पण आता चंद्रकांत खैरे चांदीचा गदा घेऊन फिरत आहेत. मात्र त्यांच्या गदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार असल्याचंही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!