Share

Gulabrao Patil | “सुषमा अंधारे ठाकरेंबद्दल काय बोलल्या आहेत त्या क्लिपा एकदा ऐकवल्या पाहिजेत, या बाईने…” गुलाबराव पाटलांचा घणाघात

Published On: 

Gulabrao Patil | मुंबई : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एक नोव्हेंबरला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात सभा होती. याबाबत प्रतिक्रिया देत असतानाच गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

सुषमा अंधारे हे इकडे येऊन तीन महिने झालेलं बाळ आहे. या पक्षामध्ये येऊन त्यांना तीन महिन्याचाच काळ झाला आहे. त्यांचं बोलणं सगळेजण ऐकत आहेत. त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल काय बोलल्या आहेत त्या क्लिपा एकदा ऐकवल्या पाहिजेत. या बाईने हिंदू देवतांवर भयानक टीका केली आहे. त्याही क्लिपा दाखवल्या तर बरं होईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर त्या काय काय बोलल्या आहेत, हिंदू धर्मावर काय बोलल्या आहेत याच्याही क्लिप्स दाखवाव्यात. अन्यथा, आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा गुलाबरावांनी दिला आहे. सुषमा अंधारेंनी आमच्यावर टीका जरूर करावी. तो त्यांच्या पक्षाने त्यांना दिलेला अधिकार आहे. मात्र, हिंदू देवतांवर या बाईने किती भयानक टीका केली, हिंदूंबाबत किती भयानक भाषणं केली असल्याचं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही बंडखोर नाही, आम्ही उठाव केलेला आहे. आम्हाला कमिटीने सुरक्षा दिलेली आहे. ही सुरक्षा मुख्यमंत्री देत नाहीत. सुरक्षा देण्यासंदर्भात कमिटी असते आणि कमिटी ज्याप्रमाणे सूचना करते त्याप्रमाणे गृहखातं सुरक्षा देत असतं. काही लोकांची सुरक्षा कमी अधिक झाली असेल तर ते कमिटीच्या अहवालानुसार झाली असेल, असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!