Share

BJP on Rohit Pawar | “मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला…” ; भाजपचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

Published On: 

BJP on Rohit Pawar |   मुंबई  : टाटा-एअरबसने विमान निर्मिती प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याच्या वादावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आमचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प जात आहेत, असे खोटे आख्यान तयार केले जात आहे. हे खरे नाही. प्रकल्पांच्या तोट्यासाठी मागील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांवर देखील निशाणा साधला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले होते. यावर भाजपने प्रत्युउत्तर दिले आहे.

काय म्हणले होते रोहित पवार-

रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच HMV म्हणजे He_is_Maharashtra’s_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि WMV म्हणजेच We_Are_Maharashtra’s_Voice व्हावं लागणार आहे.

देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य –

“आमचं सरकार सत्तेत येऊन तीन महिने झालेत. तरीही महाराष्ट्रातून उद्योग राज्याबाहेर चाललेत, असा फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. हा फेक नेरेटिव्ह तयार करण्यामध्ये काही राजकीय पक्ष आणि काही HMV पत्रकार एकत्रितपणे महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. काही HMV पत्रकार सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. सरकारच्या विरोधात प्रचार करत आहेत”, असे फडणवीस म्हणाले. यावर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.

भाजपचे प्रत्युउत्तर –

“मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला,ही अवस्था रोहित पवार यांची आहे. पत्रकार राहुल कुलकर्णीला तुरूंगात टाकणारे तुम्हीच होता, हे कसं विसरलात? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली फेक नारेटीव्ह चालवायचं, देशद्रोह्यांना पाठीशी घालायचं तुमचाच धंदा आहे म्हणून तर मिर्ची लागली,” असे भाजपने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!