🕒 1 min read
पुणे : कोरोनामुळे लग्न समारंभ यांवर गदा आली आहे. अनेक नियोजित लग्न समारंभ हे रद्द करण्यात आले आहेत. यावर आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काहीसा दिलासा आहे. पुणे जिल्ह्यात कंटेनमेंट झोन वगळता कुठेही 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास आता परवानगीची गरज नाही. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
लग्न समारंभात अनेकजण एकत्र येत असतात. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणे कठीण असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यावर आता नवीन उपाय शोधण्यात आला आहे. केवळ 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत छोटा लग्न समारंभ पार पाडता येऊ शकतो. मात्र यासाठी देखील काही सूचना दिल्या आहेत.
त्या सूचना अशा आहेत की, पुणे जिल्ह्यात 50 लोकांमध्ये लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही. कंटेनमेंट झोन वगळता जिल्हांतर्गत कुठेही जाऊन लग्न करता येऊ शकते. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील इतर कंटेनमेंट झोन वगळून जिल्हांतर्गत लग्नासाठी परवानगीची गरज नाही. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून आणि नियमांचं काटेकोर पालन बंधनकारक. कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. त्याचबरोबर कोणालाही कंटेनमेंट झोनमधून ये-जा करता येणार नाही.
दरम्यान या निर्णयामुळे विवाह इच्छुकांना नक्कीचं दिलासा मिळणार आहे. देशात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा फटका नियोजित कौटुंबिक समारंभांना देखील बसला.
महत्त्वाच्या बातम्या
महिन्याभरात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरणार, राजेश टोपेंचा मोठा निर्णय
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
