नाशिक, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेली स्वॅब तपासणी लॅबचे काम आजपासून सुरु झाले आहे. कोरोनाची प्राथमिक तपासणी या लॅबच्या माध्यमातून होणार असून त्यामुळे रुग्णांचे निदान तात्काळ होऊन पुढील निर्णय घेणे सहज शक्य होणार आहे.
या लॅबच्या माध्यमातून दिवसाला 180 नमुने तपासणी होणार असून दुसरे यंत्रही लवकरच कार्यरत झाल्यावर त्याची क्षमता 360 पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी होणार असल्याने या लॅबचा फायदा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला होणार असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेल्या टेंस्टींग लॅबच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मविप्रच्या सरचिटणीस निलीमाताई पवार , शिक्षणाधिकारी एन.एस.पाटील, अधिष्ठाता डॉ.मृणाल पाटील, डॉ.दादासाहेब दातार, स्नेहा दातार, डॉ. प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, लॅब तयार करण्यासाठी मविप्र व दातार लॅब यांचेकडील साधने व तंत्रज्ञान यांचे एकत्रिकरण केले व एक सुसज्ज अशी लॅब आज तयार करण्यात आली असून जिल्ह्यासाठी खरच एक आनंदाची बाब आहे. पुण्याला स्वॅब रिपोर्ट पाठविण्याची जी आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असे ती या लॅबमुळे थांबणार आहे. रिपोर्ट तातडीने आल्याने रुग्णांचे क्वारन्टाईन व्यवस्थापनेचे काम सुद्धा सोपे होणार आहे. लॅब सुरु करण्याचे यश प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या पाठपुराव्यामुळे आले असल्याचे भुजबळ म्हणाले.
#WarAgainstVirus#coronavirus टेस्टिंग लॅबचा #नाशिक सह उत्तर महाराष्ट्राला फायदा
पालकमंत्री @ChhaganCBhujbal यांनी केली लॅबची पाहणी➡ विशेष वृत्त- https://t.co/lbCeO5379X pic.twitter.com/prye5vxbZC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 28, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

