मुंबई : देशभरात आज (२९ जून) पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर १२ पैशांची वाढ झाली आहे. काल (२८ जून) पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. गेल्या महिन्यात उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळीने भागवली भूक, आतापर्यंत २८ लाख ८५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
तेल कंपन्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एकाच दिवशी वाढवतात, परंतु राज्यांमध्ये त्यांचे दर वेगवेगळे आहेत कारण त्यावर आकारण्यात येणारा सेल टॅक्स किंवा व्हॅट वेगवेगळ्या राज्यात बदलतात. मुंबईत पेट्रोलचे दर हे प्रचंड वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर हे ८७.१९ रुपयांवर पोहचले आहेत. तर डिझेलचे दर हे ७८.८३ पर्यंत गेले आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत वाढलेली पाहायला मिळत आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर हा ८०.४३ रुपये आहे तर डिझेलचा दर ८०.५३ रुपये एवढा आहे. दिल्ली सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यामुळे दिल्लीत डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे.
आनंदाची बातमी : राज्यात ८६ हजार ५७५ कोरोनाचे रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी
दिल्ली सरकारने डिझेलवरील व्हॅट दर 16.75% वरुन 30% पर्यंत वाढविला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरील कराचा दर 27% वरुन 30% करण्यात आला. दिल्लीत डिझेलचे दर देशभरात दुसर्या क्रमांकावर आहेत. राजस्थानमध्ये डिझेल सर्वात महाग आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

