🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या राजकारणात सध्या क्रिकेटची उदाहरण दिली जात आहेत. तर ही उदाहरण देत असताना राजकीय नेत्यांमध्ये चांगलीचं टोलेबाजी सुरु आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकत या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी चांगलाचं टोला लगावला आहे.
नितीन गडकरी जे म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. मात्र सध्या भाजपचा चांगलाचं क्लीन बोल्ड झालाय हे देखील त्यांनी स्वीकारायला हवं, असा टोला नवाब मलिकांनी लगावला आहे. तसेच मलिक यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार भाजपचंच येणार या दाव्याचाही समाचार घेतला.
ते म्हणाले की, ते म्हणाले, फडणवीस त्यांच्याकडं 105 आमदार असल्याचं आणि 119 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत आहेत. मग राज्यपालांकडे त्यांनी सरकार का बनवू शकले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपकडं बहुमतासाठी आवश्यक आमदारांची संख्या नाही. त्यांनी सत्तेसाठी लोकांना पळवून एकत्र केलं होतं. आता हे लोक सोडून जावू नये म्हणून त्यांना आपलं सरकार येणार असं सांगावं लागत आहे, असंही मलिक यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195576300481593344?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195572566670229504?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195571503728693249?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
