मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तिच्या अभिनयावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. नुकतचं तिने एक व्हिडीओ सोशल मीडियो शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी देखील कमेंटस केले आहे.
अभिनेत्री अनुष्का यू के वरून परत येताच एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला तिने ‘कोणी तरी पॅक अप असे बोलले का?’, असे कॅप्शन दिलं आहे. यात ती दोन पडद्याच्यामधून येऊन कॅमेराकडे बघत हसताना दिसते आहे. तसंच तिने व्हिडीओसोबत मजेशीर गाणं देखील जोडले आहे. तु मुलीसमोर अशी हसणार नाही ना, हटके लूक अशा या पोस्टवर मजेदार कमेंटस आले आहे. सेलिब्रिटी मध्ये अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कतरिना कैफ, दिया मिरजा यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे.
https://www.instagram.com/p/CUpaH0ylmVx/?utm_medium=copy_link
अनुकाने ‘रब ने बनादी जोडी’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली. नंतर ‘बदमाश कंपनी’, ‘बॅंड बाजा बारात’, ‘मातृ की बिजली का मंडोला’, ‘पीके’, ‘एनएच १०’, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘सुल्तान’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘फिल्लौरी’, आशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या वेगळया लूकमधील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून लाईक्स कमेंटस् मोठया प्रमाणात येत आहेत
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप


