पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात बाबासाहेबांच्या पर्वती इथल्या घरी येऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारकडे बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करण्याची भावूक मागणी केली आहे.
बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे शिवप्रेमींच्या स्वप्नातल्या शिवसृष्टीच्या निर्माणाला सुरुवात झाली. राज्य शासनाला, केंद्र शासनाला तसंच जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की, त्यांची ही इच्छा, फक्त त्यांचीच नव्हे तर ज्या कोणाचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, जे त्यांना गुरुस्थानी मानतात त्यांची ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी उदयनराजेंनी राज्य सरकारकडे केली आहे.
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, आमच्या कुटुंबातले एक घटक आदरणीय सन्माननीय, पूज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली न भरुन येणारी ही पोकळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जे दुःखाचं सावट आलेलं आहे, त्यात मी आणि माझे सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुरंदरे वादग्रस्त पवारांसाठी असतील आमच्यासाठी नाही’, भाजपचा पलटवार
- ‘आम्ही जुळवून घ्यायचं ठरवलंय, तुम्ही दिवस मोजत बसा’
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा निषेध
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

