Share

‘पुरंदरे वादग्रस्त पवारांसाठी असतील आमच्यासाठी नाही’, भाजपचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास राज्याच्या समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्देही होते’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर व्यक्त केली आहे. त्यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

भातखळकर ट्विट करत म्हणाले, शिवशाहीर पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासाठी आयुष्य खर्ची घातलं, पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. बाबासाहेबांचे शिवचरित्र हे ऐतिहासिक कागदपत्रांच्या ठोस पुराव्यांसह लिहीले आहे. त्यात वादग्रस्त मुद्दे तुमच्यासाठी असतील आमच्यासाठी नाहीत. असे भातखळकर म्हणाले.

नाशिकमध्ये शरद पवार पत्रकारांशी बोलतातना म्हणाले, ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवचरित्राबद्दल शेकडो व्याख्यानं दिली. शिवाजी महाराजांच्या इतिहासासंबंधी आस्था निर्माण करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते. सतत लोकांशी सुसंवाद ठेवत, त्यांच्या सदिच्छा मिळवत त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. ते आज आपल्यात नाहीत. त्याबद्दलची अस्वस्थता व दु:ख अनेकांच्या मनात आहे,’ असं पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास राज्याच्या समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्देही होते, पण त्या संबंधी भाष्य करण्याएवढा मी जाणकार किंवा इतिहास तज्ज्ञ नाही. हे सगळं असलं तरी त्यांचं काम मोठं होतं. कुणीही एखाद्या विषयात आयुष्य खर्ची केल्यानंतर काही लोक त्यात उणे काढण्याचा प्रयत्न करतात. तसं त्यांच्या बाबतीतही झालं असावं. असं असलं तरी इतिहासाबद्दल आस्था निर्माण करण्यात त्यांनी दिलेलं योगदान आपण विसरू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!