Share

पहिल्या दिवसांपासून आम्ही गोळा-बारुद घेऊन तयार आहोत, आता मैदानामध्ये या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ” मातोश्री बंगल्यात बसून आदेश देणे सोपे असते. विधीमंडळात प्रश्नांची अधिकृत उत्तरं द्यावी लागतात. पहिल्या दिवसांपासून आम्ही गोळा-बारुद घेऊन तयार आहोत मैदानामध्ये या, अशी टीका भाजपवासी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

राणे कुटुंब आणि शिवसेनेतील वाद संपूर्ण राज्याला माहित आहे. अशातच राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचा सत्ता संघर्षाचा तिढा सुटला असून आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा विधानभवनात शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

त्यानंतर ते म्हणाले, ‘ज्या पक्षाच्या आमदारकीची शपथ घेतली. त्या पक्षाचा अभिमान आहे. कारण त्या पक्षाने सत्तेसाठी लाचारी केली नाही’, तसंच भाजपने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन मिटिंग घेतली नाही. कोणाचे तळवे चाटले नाही. त्यामुळे मी भाजपसोबत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या हक्कासाठी, महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला निवडून दिले आहे आणि आम्ही न्याय मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी असे सांगितले की, ‘राजकारण बाजूला पण एक कुटुंब एकत्र राहत असेल त्यात समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1199591800865869826?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1199592186053984256?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!