Share

तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, मनसेचा बॉलिवूडकरांना शब्द

Published On: 

मुंबई : बॉलिवूडला संपवण्याचा किंवा मुंबईतून बाहेर इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही हे कारस्थान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ आणि भाजप यांना दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

आता, उद्धव ठाकरेंपाठोपाठ मनसे देखील बॉलिवूडकरांच्या पाठीशी उभी राहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनाअध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून या प्रकरणावर भाष्य केलं असून फिल्मसिटी मुंबईबाहेर हलवायचं कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. ” भूतकाळातही बाॅलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बाॅलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बाॅलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.” असा गंभीर आरोप देखील अमेय खोपकर यांनी केला आहे.

तर, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे” अशी ग्वाही मनसेतर्फे बॉलिवूडला देण्यात आली आहे.

बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मुंबईतील बॉलीवूडमध्ये हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बनतात. या चित्रपटांचे चाहते जगभरात सर्वत्र आहेत. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे,”असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!