Share

रामाच्या नावानं आणखी किती वर्ष राजकारण करणार, शिवसेना नेत्याचा भाजपला सवाल

Published On: 

मुंबई : रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ? असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना केलाय. कोरोना काळात नवरात्रीत रामलीलाला परवानगी द्या अशी मागणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी केलीय. या पार्श्वभुमीवर सरनाईक यांनी भातखळकरांना टोला लगावलाय.

पंतप्रधानांनी देखील कोरोना संपला नसल्याचं सांगत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना अजून संपला नाही हे भातखळकरांना माहित नाही हे दुर्देव असल्याचेही सरनाईक म्हणाले. आजपर्यंत मुंबईत महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच रामलीलाला परवानगी दिली आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही रामाच्या नावानेच मतं मागत आहात. रामाच्या नावाने किती वर्ष राजकारण करणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू सर्व गोष्टी सुरू करतायत. मॉल, मेट्रो चालू करतायत. सिनेमागृह काही दिवसात सुरू करतील तसेच मंदिरं आणि धार्मिक स्थळंही खुली करतील. महाराष्ट्र कोरोनाचे असंख्य बळी गेलेले आहेत आणि मंदिरं खुली करा अशी तुम्ही मागणी विरोधक करतायत असा टोला त्यांनी लगावलाय. फक्त राजकारण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यासाठी अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली मागणी करत असाल तर ते चुकीचे आहे. अतुलजी तुम्हाला ही जनता कधीही माफ करणार नाही असेही सरनाईक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!